श्री संत उद्धव महाराज

श्री संत उद्धव महाराजश्री संत उद्धव महाराजश्री संत उद्धव महाराज
More

श्री संत उद्धव महाराज

श्री संत उद्धव महाराजश्री संत उद्धव महाराजश्री संत उद्धव महाराज

सुस्वागतम

सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम
जगी श्रेष्ठ हा उद्धव राजयोगी, मनोवृत्तीची अर्पिली पांडुरंगी

  

वठारी विराजे जयाची समाधी भजावे तयाते त्यजूनि उपाधी |

अति आवडे पूर्ण एकाग्र चित्ते नमस्कार माझा गुरु उध्दवाते ||
 

श्री संत उद्धव महाराज हे संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचे नातू व हरी पंडितांचे पुत्र होते 

त्यांनी वाठार म्हणजे आजचे वाठार तर्फ उदगाव ता हातकणंगले, जि कोल्हापूर येथे समाधी घेतली आहे 



कालखंड - अठरावे शतक

जन्मभूमी-पैठण, विद्यार्जन-काशी, कर्मभूमी-वाठार तर्फ उदगाव,

  

त्यांनी गुरुच्या आज्ञेप्रमाणे पन्हाळगडावर १ तप म्हणजे तब्बल १२ वर्षे पराशर ऋषींच्या गुहेमध्ये तपश्चर्या केली त्यानंतर वाठार येथे मठाची स्थापना करून आजूबाजूच्या पंचक्रोशीत प्रवचन, कीर्तन, यज्ञयाग, धर्म अधिष्ठित प्रचारकार्य करावे यासाठी वाठार गाव दुमाला करून घेतले 

माहिती

कार्य

त्यांचे कार्यकाळात अनेक चमत्कार पंचक्रोशीत झाल्याच्या नोंदी आहेत त्यांच्या भक्तांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा आहे

  

त्यांच्या कीर्तन आणि प्रवचन ऐकून लोक मंत्रमुग्ध होत अध्यात्मिक समाज घडवून हिंदू धर्माची पताका फडकविण्याचे कार्य निरंतर होत असे
 

संत एकनाथांनी भागवत ग्रंथामध्ये दाखवून  दिलेल्याप्रमाणे उद्धव महाराजांचे अध्यात्मिक कार्य राहिले गेले आहे कीर्तन हा त्यांचा आवडता कार्यक्रम त्यांनी सकाळ जणांचे मानसिक प्रबोधन केले

कौटुंबिक माहिती

 श्री संत उद्धव महाराज हे संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचे नातू व हरी पंडितांचे पुत्र होते.  

त्यांनी स्थापन केलेल्या मठाचे पहिले आणि खालसा झाल्याचे वेळेला मठाधिपती उद्धव महाराजांचे पुत्र शामजी लक्ष्मण गोसावी होते 

कार्यक्षेत्र

 वाठार तर्फ उदगाव ता हातकणंगले, जि कोल्हापूर  

उत्सव माहिती

 वाठार तर्फ उदगाव ह्या तीर्थक्षेत्री दरवर्षी रामनवमी, हनुमान जयंती, नाथ षष्ठी इतर हरिभक्तांचे व वारकरी समुदायाचे कार्यक्रम नित्य नियमाने आजही अविरत चालू आहे उद्धव महाराजांनी गुरुवारी समाधिस्त झाल्यामुळं त्यांची दर गुरुवारी आरती येथील ब्रह्मवृंद आणि भक्तजन  करीत असतात 

एकनाथी भागवत

संत एकनाथ भागवत ग्रंथ हा अक्ख्या महाराष्ट्रात ह्या गावी सापडला अशी आख्यायिका आहे.

नाथ षष्ठी उत्सव २०२४ साठी खालील youtube लिंक वापर करा

मंदिर स्थाना पर्यंत पोचण्यासाठी पर्याय खालील प्रमाणे आहेत

Test

1.  ह्या संकेत स्थळावर गूगल नकाशा दाखवला गेला आहे

2. कोल्हापूरहुन पेठ वडगाव पर्यंत KMT बस आहेत 

3 तसेच पेठ वडगाव वरून बुवांचे वाठार (गाव) ST बस आहेत त्याचे वेळापत्रक

    सकाळी  8,30  पेठ वडगाव ते बुवांचे वाठार 

    सकाळी  9.30  पेठ वडगाव ते बुवांचे वाठार 

    सकाळी  11.45  कोडोली  ते बुवांचे वाठार 

4  इतर वेळी पेठ वडगाव बस स्थानक वरून share auto उपलब्ध असतात 

Public information

This website has been created and published by devotee Vallabh Vitthal Joshi.

Disclaimer

The purpose of this website is to just share information for the pilgrim those are willing to visit the place

Feedback

Feedback and suggestions are always welcome.Please write to vallabh.joshi55@gmail.com

Contact Us

Visit once for divine experience at this place

Uddhavraj Prasanna

Udhavraj Mandir, Vathar Tarf Udgaon, Maharashtra, India

Hours

Open today

09:00 am – 09:00 pm

uddhavraj

Copyright © 2024 uddhavraj - All Rights Reserved.

This website uses cookies.

We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

Accept